बव्हंशी लोक ईश्वरभक्त असूनही एवढे अनाचार, एवढी अनागोंदी, एवढी अमानुषता का वाढली आहे?
ज्याची धर्मग्रंथांवर, श्रुती-स्मृती, मंत्र-संहिता, उपनिषदांवर परमश्रद्धा आणि वेदाच्या दिव्यतेवर आस्था आहे, अशांना आस्तिक म्हणतात. तर ज्यांचा वेदावर विश्वास नाही, जे वैदिक सिद्धांतावर तर्क-वितर्क करतात किंवा धर्मग्रंथांची निंदा करतात ते नास्तिक आहेत. मात्र नास्तिकता म्हणजे एवढेच नव्हे. नास्तिकता म्हणजे विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी चिकित्सक दृष्टिकोन होय.......